Kalambist Preview Kalambist Next
कलंबिस्त युवा मित्र मंडळ (मुंबई), आपले आपल्या या वेबसाईट वर सहर्ष स्वागत करत आहे…

कलंबिस्त हे गाव कोकणातील सुंदर अश्या निसर्गरम्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, सावंतवाडी या तालुक्यात वसलेले आहे. सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावात सैनिकांची मोठी परंपरा आहे. आजही गावातील बहुतांश लोक येथे सैनिक आहेत. देश्यासाठी शहीद झालेल्या जवानांच्या या गावात प्रामुख्याने मालवणी आणि मराठी ही भाषा बोलली जाते. अनेक वाड्या (अवाट ) असलेला हा गाव तसा खूप मोठा आहे. सावंतवाडी तालुक्या पासून २१ कि.मी असलेल्या या गावाच्या आजू बाजूला वेर्ले, सांगेली, सावरवाड, शिरशिंगे ही गावे वसलेली आहेत. हिरवीगार झाडे आणि शेतीने संपूर्ण असलेल्या या गावाच्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.
Kalambist